हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Blogger VK  कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते.या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे.

कडुलिंबाची (Neem Tree) कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे , हिंग आणि मध मिसळून प्रसाद तयार केला जातो.यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण  समाविष्ट असतात.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. ९ एप्रिल २०२४ या दिवसापासून शके १९४६ आणि नव संवत्सर २०८१ प्रारंभ होईल.

गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते.

'गुढी' म्हणजे 'विजय ध्वज'. मराठी राजा शालिवाहनाने आपल्या  सैन्याने बलाढ्य शत्रूंचा (शकांचा) पराभव केला असे म्हणतात. या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवसापासून शालिवाहन शक सुरू होतो.

या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली असे म्हणतात . यामध्ये केवळ भगवान ब्रह्मदेव आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वातील मुख्य देव-देवता, यक्ष-दानव, गंधर्व, ऋषी-मुनी, नद्या, पर्वत, प्राणी, पक्षी आणि कीटक यांचेच नव्हे तर रोग आणि त्यांच्या उपचारांची पूजा केली जाते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हाच विजयोत्सवाचा दिवस.

या दिवसापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी 'पंचांग' रचले.